आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नवले पुलाजवळ ट्रकची क्रेनला धडक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • October 30, 2024
Spread the love

पुणे : पुण्यातील “मृत्यूचा सापळा” अशी कुप्रसिद्धी असलेल्या नवले पुलाजवळ बुधवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. पुलाजवळ उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो पुलाजवळ उभ्या असलेल्या क्रेनला धडकला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी अवस्थेत अडकल्याची माहिती मिळाली आहे. मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाल्यावर, जखमी व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत या पुलाजवळ झालेल्या अपघातांत अनेक बळी गेले आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.