आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनैसर्गिक अत्याचार करुन ज्येष्ठाला लुबाडले

Spread the love

पुणे: अनैसर्गिक अत्याचार करून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठाची दीड वर्षांपासून छळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

प्रिन्स प्रेमकुमार सिंग (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय एका नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सने फिर्यादीला भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेत असताना, फिर्यादी झोपेत असताना त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अत्याचार केला आणि अश्लील फोटो काढले. या फोटोंचा वापर करून नातेवाईक आणि गल्लीतील लोकांना दाखवण्याची तसेच चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली.

या धमकीचा फायदा घेत, फिर्यादीच्या नावावर मोटारसायकल आणि मोबाईल घेतला आणि वेळोवेळी २ हजार, ५ हजार असे मिळून एकूण २० ते २५ हजार रुपये घेतले. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी, प्रिन्स फिर्यादीच्या घरी आला आणि चाकूचा धाक दाखवून, “तुम्ही मला आत्ताच ५ हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्यासह तुमच्या घरच्यांना मारून टाकेन, तसेच तुमचे फोटो सगळ्या नातेवाईकांना दाखवीन,” अशी धमकी देऊन ५ हजार रुपयांची मागणी केली.

यामुळे घाबरून फिर्यादीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम करत आहेत.