आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिनेमा पहाण्यास गेले, चोरट्यांनी घर केले साफ

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Social • November 4, 2024
Spread the love

पुणे:दिवाळीत सिनेमाला जाणे वानवडीतील एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले. चोरट्यांनी भरदिवसा त्यांचे घर फोडून १६ लाखाचे दागिने लंपास कवळे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वेद वेद व्हिला सोसायटीतील एका ने पोलिसात फिर्याद दिली आहे. वेद व्हिला सोसायटी, पहिला मजला, डायमंड बेकरी रोड, वानवडीयेथील हे कुटुंब दिवाळीमुळे खरेदीसाठी व सिनेमा पाहण्यासाठी घर कुलूप बंद करून गेले होते.

चोरट्यांनी ही संधी साधत फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन, कपाटातील लॉकरमधील १६,८३,५००/-रु. किं.चे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करून नेले.
पोलीस उप निरीक्षक संजय आदलिंग तपास करीत आहेत.