आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पाषाण परिसरात घर फोडून दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider • November 4, 2024
Spread the love

पुणे : सिल्व्हर स्त्रींग सोसायटी, पंचवटी पाषाण येथी राहते घर फोडून चोरट्यांनी तीन लाखाचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पाषाण परिसरात राहणाऱ्या जेष्ठ महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सिल्व्हर स्त्रींग सोसायटी, पंचवटी पाषाण येथे राहण्यास आहेत. १४ सप्टेंबर रोजी त्या त्या मुंबईस गेल्या होत्या. १ नोव्हेंबर रोजी त्या परत आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यांनी घरातील सामानाची पाहणी केली त्यावेळी घरातील कपाटाचे लॉक तुटले होत.त्यातील चांदीचे भांडी मिळुन आली नाहीत.त्या नसताना चोरट्याने घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील ३,१२,५२५/- रु.कि.ची चांदीचे भांडी घरफोडी चोरी करून नेली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन करांडे तपास करीत आहेत.