विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडार वस्ती समोरुन मच्छी मार्केट रोडकडे जाणाऱ्या रोडने रस्ता क्रॉस करीत असताना भरधाव पीमपीबसची धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून,व भरधाव वेगात बस चालवुनफिर्यादी यांचे पती स्टीव्हन एडवीन जोसेफ (वय ६१ वर्षे रा. विश्रांतवाडी पुणे)यांचे मोटार सायकलला जबर ठोस दिली.
त्यात जोसेफ हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकरतपास करीत आहेत.
