आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पिमपीत प्रवासी महिलेचे गंठन हिसकावले

Spread the love

पुणे : पिमपीत प्रवासी महिलेचे गंठन हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कात्रज शेलार मळा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या कात्रज हून पिमपीबस मध्ये बसल्या. त्यांना स्वारगेटला जायचे होते. बस मध्ये दि.०३ नोव्हेंबर रोजी रोजी सव्वाचार च्या सुमारास ही घटना घडली.

पीएमपी बसने प्रवास करीत असताना, बस प्रवासा दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने बस मधील गर्दीचा फायदा घेवुन, फिर्यादी यांचे पर्स मधील ७५,०००/-रू.कि.चे सोन्याचे गंठण व रोख १५००/- रु असा ७६,५००/-रू.कि.चा ऐवज चोरी करून नेला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर तपास करीत आहेत.