आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टास्कचे माध्यामातुन सव्वातीन लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : टास्कचे माध्यामातुन सव्वातीन लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार दत्तनगर कात्रज परिसरात घडला आहे. या प्रकरणी दत्तनगर च्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २९ मे रोजी घडला आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारेयातील फिर्यादी यांना मोबाईल वर संपर्क साधण्यात आला, टेलीग्राम ग्रुप मध्ये अँड करुन लिंकमध्ये अकाउंट तयार करायला लावुन टास्कचे माध्यामातुन थोडीशी रक्कम दिली व त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.

नंतर त्यांना ३,२९,८००/-रू. ट्रान्सफर करण्यास सांगुन त्याबदल्यात कोणताही परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करीत आहेत.