सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन करून १९ लाख ९९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रोहिणी अमोल बंडगर (वय ३१, रा. रोहन निवास, अंजलीनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल नामदेव गडकर व किरण सुनिल गडकर (रा. आंबेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२३ ते आजपर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादींना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले आणि फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फिर्यादीच्या पत्नी व मेव्हण्याच्या खात्यावरून ऑनलाईन एकूण १९ लाख ९९ हजार २५५ रुपये घेऊन कोणतीही नोकरी न देता फसवणूक केली. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भावड करीत आहेत.
