विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हत्तीचे केस जवळ बाळगणे, त्यांची विक्री करणे हा गुन्हा आहे़, असे असताना त्याची जाहिरात करुन हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री करणाºया सराफावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वी आर घोडके सराफ, बिझी लॅन्ड इमारत, कुमठेकर असे गुन्हा दाखल झालेल्या सराफाचे नाव आहे.
याबाबत मानक वन्य जीव रक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंगठी किंवा ब्रेसलेटमध्ये हत्तीचे केस हत्तीचे शौर्य आणि सामर्थ्य दर्शवतात. काळ्या रंगाचा असल्याने तो वाईट नजरेपासून दूर जातो.
त्यामुळे ज्या मुलांना वारंवार भयानक स्वप्न पडतात आणि ज्यांना इतरांच्या वाईट कंपने प्रभावित होतात त्यांच्यासाठी हे सुचवले आहे. असे असले तरी वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये हत्तीच्या केसांची विक्री करणे अथवा जवळ बाळगण्यास बंदी आहे.
याबाबत मानक वन्य जीव संरक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी सांगितले की, घोडके सराफ यांची रेडिओवर जाहिरात ऐकली होती. तसेच त्यांची इंटरनेटवर हत्तीच्या केसापासून बनविलेले दागिने अशी जाहिरात पाहण्यात आली. आम्ही एकाला ग्राहक म्हणून त्यांच्याकडे पाठविले. त्याने हत्तीचा केस असलेली चांदीची अंगठी खरेदी केली.
ती तपासून पाहिल्यावर त्यात खरोखरच हत्तीचा केस आढळून आला. त्यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व गुन्हे निरीक्षक घोडके यांची भेट घेऊन त्यांना सर्व सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यांच्याकडे सोन्या चांदीच्या अंगठ्या, ब्रेसलेट, कडे, बांगड्या आढळून आला. त्यांच्याकडून हत्तीचा केसही हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे पुढील तपास करीत आहेत.
