आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अट्टल घरफोडी चोरटा जेरबंद करण्यात यश

Spread the love

पुणे : दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने एक अट्टल घरफोडी चोरट्याला पकडले असून, एकूण चार घरफोडी गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक क्र. १ चे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे आणि अंमलदार बाळू गायकवाड, अजित शिंदे, आणि रविंद्र लोखंडे हद्दीत गस्त घालत होते.

त्याच वेळी, रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनीय खबऱ्याने माहिती दिली की, कोंढवा पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला तौसिफ बशीर शेख (रा. कासेवाडी, १० नं. कॉलनी, म्हसोबा मंदिराजवळ, भवानी पेठ) ६ ते ७ महिन्यांपासून फरार असून, तो १० नं. कॉलनी, कासेवाडी, भवानी पेठ येथे ऑटो रिक्षामध्ये बसला आहे.

पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकला व तौसिफ बशीर शेख याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी करता, तो ४ घरफोडी गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यापैकी तीन गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन येथे, तर एक गुन्हा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक (दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक क्र. १) नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, तसेच पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, दत्तात्रय पवार, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड आणि नारायण बनकर यांनी केली आहे.