आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हरवलेले १५ मोबाईल नागरिकांना केले परत

Spread the love

पुणे : नागरीकांचे हरवलेले व चोरी झालेले १५ मोबाईल पर्वती पोलिसांनी शोधून नागरीकांना परत केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत नागरीकांचे बाजारपेठ तसेच इतरत्र मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी पर्वती पोलीस स्टेशनचे एक पथक नेमले. या पथकात पोलीस अंमलदार धायगुडे व खेडकर यांची नेमणूक करण्यात आली.

सदर पथकाने हरविलेल्या मोबाईल तसेच त्यामध्ये वापरलेले नवीन नंबर यांचे तांत्रिक विश्लेषण करून आणि प्रत्यक्ष संपर्क साधून कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण १५ मोबाईल हस्तगत केले आहेत. हे मोबाईल दि. ५ नोव्हेंबर रोजी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३, पुणे शहर संभाजी कदम यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले.

याबद्दल नागरीकांनी पर्वती तसेच पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार धायगुडे व खेडकर यांनी केली.