आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हरवलेले मोबाईल दिवाळीचे मुहूर्तावर मिळाले परत

Spread the love

पुणे : नागरीकांना त्यांचे हरवलेले मोबाईल दिवाळीच्या मुहूर्तावर सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडून परत मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल विविध ठिकाणी हरवले होते. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी त्यांच्या आयएमईआय नंबर ट्रेसिंगवर ठेवण्यात आले होते.

गहाळ झालेल्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरच्या आधारे मोबाईल कंपन्यांकडून तसेच शासनाच्या CEIR या पोर्टवरून माहिती प्राप्त करून, तांत्रिक विश्लेषण केले गेले. यामुळे एकूण २३ मोबाईल, ज्यांची किंमत अंदाजे रुपये ३,१५,०००/- आहे, नागरिकांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलीसांचे आभार मानले आहेत.


पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल हरवल्यास, पुणे पोलीसांच्या वेबसाईटवरील ‘लॉस्ट अँड फाऊंड’ किंवा शासनाच्या CEIR पोर्टलवर तातडीने नोंद करावी. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन राघवेंद्रसिंह क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार उत्तम तारू, हनुमंत गंभीरे, मयूर शिंदे, अक्षय जाधव यांच्या पथकाने केली आहे.