आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास बार्शी पोलिसांकडून अटक

Spread the love

बार्शी : बार्शी मध्ये तेल गिरणी चौकामध्ये विनापरवाना कमरेला पिस्टल लावून संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाला बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

बार्शी शहरातील लातूर रोडला असलेल्या बार्शी येथील लातूर रोड वरील तेलगिरणी चौकात कमरेला विना परवाना गावठी बनावटीचे पिस्टल लावून फिरणाऱ्या ऋषिकेश रमेश क्षीरसागर (वय २४ रा. रामहरी नगर भूम ता. भूम जि. धाराशिव) यास अटक केली आहे.

त्याला भारतीय शस्त्र अधिनियम, तसेच आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याने त्यास अटक करून बार्शी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यास ०८ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.

ही कारवाई बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाने व पोलीस उप निरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे, पो.हे कॉ. बाबासाहेब घाडगे, पो.हे कॉ. बाळकृष्ण डबडे, पो. कॉ. अनंत कळस, मोहन कदम, अंकुश जाधव, सचिन नीतनात, धनराज फत्तेपुरे, संगप्पा मुळे प्रल्हाद आकुलवार या पथकाने कारवाई केली.