आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले

Spread the love

पुणे : बुलेटवरून जाणाऱ्या एका तरुणाला तिघांनी मारहाण करून लुटल्याची घटना म्हातोबाची आळंदी येथील शिव मंदिराजवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी तरुण (वय ३२ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी) बुलेटवरून रात्रीच्या सुमारास जात होता. म्हातोबाची आळंदी रेल्वे पुलाच्या काही अंतरावर शिव मंदिराजवळ तीन अनोळखी इसम मोटारसायकलवरून आले. त्यांनी कट मारून त्याला थांबवले.

फिर्यादीच्या हातात असलेले ५,०००/- रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट हिसकावून घेतले व खिशातील १७००/- रुपये रोख काढून घेतले. त्यांनी बुलेटवर दगड फेकून तिथून पळ काढला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.