आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चोरट्यांनी धमकी देऊन दुचाकी केली लंपास

Spread the love

पुणे : चोरट्यांनी बोपोडी येथील हॅरिस पुलावर एका तरुणाला अडवून धमकावले आणि त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. फिर्यादी तरुण भोसरी येथील रहिवासी आहे. तो मोटारसायकलवरून घरी जात असताना पुलावर दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला अडवून धमकावले आणि त्याची दुचाकी हिसकावून पळून गेले. खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ करीत आहेत.