आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले

Spread the love

पुणे : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना खडकीतील आंबेडकर चौक परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रघुवीर सोसायटी समोर घडला आहे.

या अपघाताची फिर्याद शिवानंद गणमुखी (वय २४ वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी दिली आहे. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला त्यांचा मित्र काशिनाथ अंबादास गवंडी (वय २४ वर्षे) जागीच ठार झाला. डंपर चालक पळून गेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करीत आहेत.