आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फोनवर बोलत असताना मोबाईल हिसकावला

Spread the love

पुणे : पुणे-नगर रोडवर शेल पेट्रोल पंपाच्या समोर फोनवर बोलत असताना दोन चोरट्यांनी किंमती मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार भरदिवसा सकाळी घडला आहे. वडगाव शेरी येथील एका तरुणाने या बाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या मित्राची वाट पाहत उभे असताना त्यांस फोन करीत असताना हा प्रकार घडला. या फोनची किंमत सत्तर हजारावर आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स. मो. चौधरी तपास करीत आहेत.