आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुकुंदनगर मधून कारची चोरी

Spread the love

पुणे : मुकुंदनगर येथील सोसायटी समोर पार्क केलेली कारची चोरी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका महिलेने (वय ५० वर्षे रा. सोमवार पेठ, पुणे) पोलिसात तक्रार दिली आहे. दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास लक्ष्मीविलास सोसायटी मुकुंदनगर येथे त्यांनी त्यांची कार पार्क करून ठेवली होती. एका अज्ञात चोरट्याने ही कार (किमत अडीच लाख रुपये ) चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.पी. शिरसट करीत आहेत.