आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तोतया पोलिसाने लांबविली सोन्याची चैन

Spread the love

पुणे : एका भामट्याने खरेदीच्या बहाण्याने तोतया पोलिसाने सराफाच्या दुकानातून ८४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:६० च्या सुमारास राजमाता चौक कर्वेनगर परिसरातील एका सराफा दुकानात घडला. अनोळखी भामटा खरेदीच्या बहाण्याने पोलीस असल्याची बतावणी करुन दुकानात शिरला.

सोन्याची चैन घेण्याच्या बहाण्याने त्याने चैन गळ्यात घातली व बाहेर पडला. त्याचे जवळील पॅन्टचे खिशातून एक पांढऱ्या रंगाचे बंद पाकीट बाहेर काढून ते दुकानाचे कांऊटरवर ठेवून बील करायचे आहे असे सांगितले.

दोन मिनीटात आलो असे म्हणून तो दुकानातून निघुन गेला त्याने कांऊंटरवर ठेवलेले बंद पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये बारीक घडी घातलेला पेपर असल्याचे दिसून आले. चोरट्याने फिर्यादी यांची ८४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याची चेन फसवणूक घेवुन गेला. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.