आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

धनकवडीत पळापळ, जुगार अड्ड्यावर छापा

Spread the love

पुणे : ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत धनकवडी भागातील पेट्रोल पंपाजवळ सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याने एकच पळापळ उडाली.

या ठिकाणी जुगार अड्डासुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानंतर दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), गणेश कदम (वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे (वय ५५, रा. बिबवेवाडी), दादासाहेब जोगदंड (वय ३५, रा. पद्मावती), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड), अर्जुन थोरात (वय ४९, रा. धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.