आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मामानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Spread the love

पुणे : आईवडिल कामानिमित्त बाहेर गेले असताना मामानेच अल्पवयीन मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या भावाला व वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली.

याबाबत एका १६ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २३ वर्षाच्या मामाला अटक केली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर २०२३ रोजी फिर्यादीच्या घरी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असून तिचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तिचा भाऊ घराबाहेर कुठेतरी गेला होता़. अशा वेळी घरात ती एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्या मामाने फिर्यादीवर दोन वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

हा प्रकार कोणाला काही एक सांगितला तर तिला व तिचा भाऊ व वडिलांना जीवे मारुन टाकीन अशी धमकी देत होता. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर आता पुन्हा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याने तिने हा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मामाला अटक केली आहे़. हा तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करीत आहेत.