आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार

Spread the love

बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बार्शीच्या हर्षद लोहार यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी दिली.

डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात म्हणून काम करणार असल्याचे नवं नियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. लवकरच राज्याची कार्यकारणी आणि सर्व जिल्हाअध्यक्ष यांची निवड करणार असल्याचेही लोहार यांनी निवडीनंतर सांगितले.