बार्शी शहर गुन्हे शाखेची कामगिरी : चार लाखाचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेने घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला ४,२९, २१०/- रूपये किमंतीचा मुददेमाल हस्तगतकरण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रविण शिवशंकर थळकरी (रा. बुरुड गल्ली बार्शी ता. बार्शी ) यांच्या घरातून १४ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरटयाने घराचा लाकडी दरवाजा उचकटुन घरात शिरून सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तु एक एल.ई.डी. टिव्ही व रोख रक्कम १५,०००/- रूपये चोरून नेले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर व पोलीस अंमलदार यांना गुन्ह्याचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीने केल्याची माहिती पोलीस हवालदार श्रीमंत खराडे यांना माहीती मिळाली.
सदर माहीतीवरून आरोपी नागेश राजु बगाडे (रा. बार्शी, जि. सोलापूर ) यांस ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक करण्यात आले .
चोरी केलेला घरफोडीतील ४,२९,२५०/- रूपये एकुण किमंतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तु एक एल.ई.डी. टिव्ही व रोख रक्कम १४,०००/- रूपये हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरूध्द मुंबई शहर, पुणे शहर तसेच बार्शी शहर पोलीस ठाणेस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर , बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, पोलीस हवालदार श्रीमंत खराडे, अमोल माने, बाळकृष्ण डबडे, बाबासाहेब घाडगे, संगप्पा मुळे, अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामिया बहिरे गुन्हे प्रकटीककरण पथक बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर हे करीत आहेत.
