आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लिल फोटो अपलोड

Spread the love

पुणे : मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने मैत्रिणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर मैत्रिणीचे अश्लिल फोटो अपलोड करुन तिला कॉलगर्ल संबोधून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी २१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी २४ वर्षाच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ आॅक्टोंबर ते १७ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षाच्या तरुणीची आरोपीसोबत मैत्री होती. त्याच्या वर्तणुकीमुळे तिने त्याच्याबरोबरची मैत्री तोडली. याचा राग मनात धरुन त्याने सोशल मीडियावर तिच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले.

त्यावर तिचे अश्लिल फोटो अपलोड करुन तिला कॉलगर्ल संबोधले. तिने त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली.

आरोपीने फिर्यादी यांचे इन्टाग्राम, फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करुन तिला कॉलगर्ल असे म्हणून त्यावर तिचा फोन नंबर लिहून बदनामी केली. हा तपास गुन्हे निरीक्षक विक्रमसिंग कदम करीत आहेत.