उपवर वधुचा केला विनयभंग : दत्तनगरमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विवाह ठरल्याने त्याने मित्राला पार्टीला बोलावले. दारुच्या नशेत त्याने मित्राची उपवर वधुचा हात धरला. त्याचा मित्राने जाब विचारल्यावर त्याने मित्राच्या हातावर दारुची बाटली फोडली. तर तरुणीने विनयभंगाची फिर्याद दिली असून दोघांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित महेंद्र पाटील (वय ३०, रा. भोसलेनगर, शिवाजीनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आगम प्रसाद (वय ३०, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याच्याविरुद्ध दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी फिर्याद २६ वर्षाच्या मैत्रिणीने दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित पाटील व त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आरोपीच्या दत्तनगरमधील टेल्को कॉलनीतील घरी मंगळवारी पहाटे १ वाजता घडली.
आगम प्रसाद याचा विवाह ठरला आहे. त्याने आपला मित्र रोहित पाटील याला घरी बोलावले. दोघे दारु पित बसले होते. त्यावेळी आगम याची मैत्रिणही तेथे होती. काही वेळाने रोहित याने त्याच्या मैत्रिणीला फ्लॅटवर बोलावून घेतले. फिर्यादीचा मित्र त्याच्या बेडरुममध्ये झोपी गेल्यानंतर आरोपी हा फिर्यादीकडे वाकड्या नजरेने पाहु लागला.
त्याने फिर्यादीचा उजवा हाथ धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावरुन फिर्यादी आरोपीला खडसावून बोलत होती. त्यांचा आवाज ऐकून बेडरुममध्ये झोपलेला मित्र उठून बाहेर आला.
त्याने आरोपीला जाब विचारताच त्याने दोघांना हाताने मारहाण केली. फिर्यादीचे गळ्यास ओरखडून चष्मा फोडला. त्यावेळी आरोपीने फियार्दीच्या मित्राच्या डोक्यात दारुची बाटली फोडली.
फुटलेली दारुची बाटली फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंज्यावर मारुन जखमी केले. त्यानंतर भाजी कापण्याच्या चाकूने त्याने मित्रावर वार करुन जखमी केले. तुमच्याकडे बघुन घेतो, अशी धमकी दिली. पोलीस हवालदार पी. डी. टापरे तपास करीत आहेत.