आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत साजरा झाला फाउंडेशन डे

Spread the love

पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचा फाउंडेशन डे (स्थापना दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस शाळेच्या आतापर्यंतच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा आणि भविष्यात गाठायच्या उद्दिष्टांचा आढावा घेण्याचा दिवस ठरला. शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा विचार करता, शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर आणि शाळेची झालेली वाढ हे लक्षणीय ठरले आहे.

या कार्यक्रमासाठी एच. व्ही. देसाई कॉलेज व द पुना गुजराती केलवानी मंडळाचे चेअरमन राजेश शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्तवन आणि प्रार्थनेने झाली.

शाळेच्या गायकवृंदाने सादर केलेले मधुर गायन उपस्थितांना भावले. प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका स्नेहल खटावकर यांनी शाळेचा अहवाल सादर केला. अहवालात त्यांनी शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांची आणि शाळेच्या यशाची माहिती दिली.

कार्यक्रमात आचार्य श्री विजय वल्लभ शाळेच्या वृत्तपत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या वृत्तपत्रामध्ये शाळेतील विविध कार्यक्रम व उपक्रमांचे चित्रण करण्यात आले आहे.

यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना धार्मिक उत्कृष्टतेसाठी बक्षिसे देण्यात आली. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शाळेत चालणाऱ्या उपक्रमांचे दर्शन घडवणारी सुंदर नाटिका सादर केली.

प्रमुख पाहुण्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ट्रस्टी यांचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शाळेविषयी आपले भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाला शाळेचे मॅनेजिंग ट्रस्टी सुभाष ओसवाल, ट्रस्ट सेक्रेटरी केसरीमल मुथा, ट्रस्टी विजयराज रांका, शाळेचे चेअरमन सुभाष परमार, सेक्रेटरी पुखराज संघवी, आणि ट्रस्टी जवनमल कांकरिया उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका विमल परदेशी, स्नेहल खटावकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक भविका राठोड आणि कल्पेश दर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.