आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दहावीतील विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Spread the love

पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईलवरुन १५ वर्षाच्या दहावीतील मुलाला त्रास दिला जात होता. या मानसिक त्रासाला कंटाळून या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगरमध्ये समोर आला आहे.

याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. भवानी पेठ तसेच मोहननगर, धनकवडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तळजाई येथील टेकडीचे परिसरात नोव्हेबर २०२३ ते १५ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १५ वर्षाच्या मुलगा दहावीमध्ये शिकत होता. त्याच्या परिसरात रहायला आलेल्या संकेत मोहिले याच्याबरोबर ओळख झाली. संकेत मोहिले हा त्याला गेल्या वर्षी तळजाई येथील टेकडीवर घेऊन गेला. तेथे आडबाजूला त्याने आपले कपडे काढून मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले. त्याचे त्याने फोटो काढले.

त्यानंतर त्यास वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन सतत फोन करुन त्रास देत होता. मुलगा दिवसेंदिवस चिंतेत असल्यासारखा दिसत असल्याने वडिलांनी त्याबाबत मुलाला विचारले. तेव्हा त्याने वडिलांना संकेत मोहिले त्रास देत असल्याचे सांगितले. या प्रकाराने या मुलाचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यातून त्याने १५ नोव्हेंबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाचे धार्मिक संस्कार केल्यानंतर आता वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.