आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाविकास आघाडी धनगर समाजातर्फे आंदोलन

Spread the love

पुणे : महाविकास आघाडीच्या (ओ.बी.सी.) धनगर समाजाच्या वतीने ईव्हीएम मशिन घोटाळ्याचा विरोध आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी असा आरोप केला की, लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या नावाचा वापर करून फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंत्रीपदाच्या लालसेपोटी हे नेते समाजाची घोर फसवणूक करत आहेत.

याशिवाय, त्यांनी समाजाच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करत, विशेषतः शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे. आंदोलकांनी या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी केली. महाविकास आघाडीच्या वतीने शांततेच्या मार्गाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नेत्यांच्या चुकीच्या भूमिकांचा निषेध केला.

या आंदोलनाचे आयोजन देवेंद्र धायगुडे-पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), किरण शिंदे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते), अभिषेक साठे, शिवाजी हिरवे, प्रवीण धायगुडे, अनिल गवळी, बलराम शिळीमकर, आकाश धायगुडे, संदेश ठोंबरे, राजू ढेबे, राहुल धायगुडे यांनी केले होते. तसेच, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची या आंदोलनात उपस्थिती होती.