अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या तरुणावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाढदिवसानिमित्त घरी जाऊ असे म्हणून अज्ञात ठिकाणी नेऊन वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शारीरीक सुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अलीम जुबेर शेख (वय २२, रा. पिंपळे निलख) याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ जुलै २०२४ रोजी घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला आज माझा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानिमित्ताने त्याने या मुलीला घरी घेऊन जातो, असे सांगितले़ प्रत्यक्षात घरी न नेता अज्ञात ठिकाणी बिल्डिंगच्या पार्किगमध्ये असलेल्या खोलीत नेले.
तेथे आज माझा वाढदिवस आहे. तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी करु लागला. तेव्हा तिने त्यास नकार दिला. त्यावर त्याने तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला.
तसेच ‘‘तुने इसके बारे मे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार तेव्हा कोणाला सांगितला नव्हता़. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहे.
