आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकी विकत देतो, सांगून ५६ हजारांना चुना

Spread the love

पुणे : ज्युपीटर किंवा होंडा स्कुटर विकत देतो, असे सांगून ऑनलाईन पैसे घेऊन स्कुटर न देता, ५६ हजार रुपयांना चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत राजेंद्र श्रीधर आफळे (वय ५५, रा. दामोदर संकुल, दामोदरनगर, हिंगणे खुर्द) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रफुल्ल उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथील माणकर बिल्डिंग येथे २१ ऑक्टोबर रोजी घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल उबाळे याने फिर्यादी आफळे यांना स्वत: ज्युपीटर किंवा होंडा स्कुटर विकत देतो, असे सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून आफळे यांनी त्याला ऑनलाईन गुगल पे द्वारे ५६ हजार रुपये दिले. त्यानंतर गाडी देण्यास उबाळे याने टाळाटाळ केली. तेव्हा आफळे यांनी पैसे परत मागितले. तेही परत न करता फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक कैलास दाबेराव तपास करीत आहेत.