आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

या कारणामुळे मतमोजणीची रंगीत तालीम झाली नाही

Spread the love

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी लागणारे संगणक व त्याच्या जोडणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याने, आदल्या दिवशी मतमोजणीची रंगीत तालीम घेता आली नाही. त्यामुळे प्रशासनाने इंदु इन्फोटेक कंपनीवर कारवाई केली.

याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गोसावी यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीतील पुणे शहरातील ८ मतदारसंघांतील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात करण्यात आली होती.
मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी इंदु इन्फोटेक कंपनीला संगणक पुरवठा व जोडणीचे काम कराराने देण्यात आले होते.

मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार होती. त्याआधी, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते, जेणेकरून रंगीत तालीम घेता येईल. मात्र, कंपनीने हे काम वेळेत पूर्ण केले नाही.

मतमोजणी प्रक्रियेसाठी बोलावण्यात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना कोरेगाव पार्क येथील गोदामात उपस्थित राहावे लागले. परंतु संगणक जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने मतमोजणीची पूर्व रंगीत तालीम घेता आली नाही.

इंदु इन्फोटेक कंपनीने हे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे, शेवटी प्रशासनाला हे काम इतरांकडून पूर्ण करून घ्यावे लागले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. यामुळे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर करत आहेत.