• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Friday, April 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पेट्रोल चोरीच्या संशयातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यु

December 3, 2024
0
03 12 24
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

नर्‍हे येथील घटना, तिघांना अटक, माजी उपसरपंच फरार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : दुचाकीतून पेट्रोल काढत असताना पेट्रोल चोर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला. पोलिसांनी या अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. त्यात आता खुन हे कलमवाढ करण्यात आले आहे.

समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, नर्‍हे) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव संजय कुटे (वय २४), अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २०), राहुल सोमनाथ लोहार (वय २३, रा. मानाजीनगर, नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी समर्थचे वडिल नेताजी भगत यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २५ नोव्हेबर रोजी पहाटे ६ वाजता घडली होती.

समर्थ हा डेक्कन येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. समर्थ व त्याचे मित्र २४ नोव्हेंबरला दारु पिले होते. वडिल रागावतील, म्हणून समर्थ रात्रभर बाहेर फिरत राहिला. त्याच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने मानाजीनगर येथील एक गाडीतील पेट्रोल काढत होता.

हे गौरव कुटे व इतरांनी पाहिले. त्यांनी पेट्रोल चोर म्हणून समर्थ याला लाथाबुक्क्यांनी व सायकलच्या चैनने बेदम मारहाण केली. हे समजल्यावर त्याचे वडिल तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी समर्थ याला नवले हॉस्पिटलमध्ये नेले.

तोपर्यंत समर्थ बेशुद्ध पडला. त्याच्यावर ६ दिवस उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्याची प्रकृती खालावल्याने रविवारी त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे पुढील तपास करीत आहेत.

Dec 20244 1

Latest Articles

‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

April 24, 2026
१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

April 24, 2026

JITO Skillsthon Pune-2026 : Title Sponsor – Navitas Solar

April 24, 2026

JITO Skillsthon Pune-2026 Co-Powered By Sponsor – Dal Roti ( Your Trading Buddy)

April 24, 2026
व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
Load More
Previous Post

या कारणामुळे मतमोजणीची रंगीत तालीम झाली नाही

Next Post

सेवा, सहयोग और समर्पण से महासाध्वी डॉ. राजश्रीजी का जीवन प्रेरणादायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta