आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

Spread the love

बार्शी : विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी बार्शी तालुका पोलीस ठाण्याने तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वात, बार्शी तालुक्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी निवडणूक अत्यंत शांततेने व यशस्वीरीत्या पार पडली.

या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस विभागाच्या कार्याचे नागरिकांनीही कौतुक केले आहे.