आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

Spread the love

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या मून थाई स्पावर भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून मॅनेजरला अटक केली आहे.

याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. स्पा मॅनेजर सताऊद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन (वय २२, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या मॅनेजरचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेल शेजारील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समधील मून थाई स्पा येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुुरु असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाला तेथे पाठविले.

या ग्राहकाने मिस कॉल देऊन पोलीस पथकाला इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी मून थाई स्पावर छापा टाकला. तेथे असलेल्या सताउद्दीन हुसेन या मॅनेजरला अटक करुन वेश्या व्यवसाय करुन घेतला जाणाऱ्या तीन महिलांची सुटका केली.

बाणेर पोलीस स्टेशनमध्ये स्पा मालकावर अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.