आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुमा कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री

Spread the love

पुणे : पुमा कंपनीचा लोगो वापरुन बनावट बॅग, टि-शर्ट, स्पोट्स शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा घालून ८ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. स्टाइलॉक्स फॅशन हब (रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) या दुकानमालकावर आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

स्टाइलॉक्स फॅशन हब (रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) या दुकानमालकावर आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॅन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती.

त्यानुषंगाने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिले होते. पुमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधीमार्फत पुणे शहरात शोध मोहिम सुरु होती.

आंबेगाव बुद्रुक येथील स्टाइलॉक्स फॅशन हब या दुकानात बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या मदतीने पोलिसांनी या दुकानावर छापा घातला.

दुकानात मोठ्या प्रमाणावर पुमा या ब्रॅडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोट्स शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री सुरु होती. तेथून ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली.