आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पामालकाला अटक

Spread the love

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या अरमोनिया फॅमिली स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडित महिलांची सुटका केली. तेथील स्पा मॅनेजर व मालकाला अटक केली आहे.

सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे, सध्या रा. पुणे) असे स्पा मॅनेजर व मालकाचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी जकात नाकाजवळील गुडविल स्क्वेअर मॉल येथील दुसर्‍या मजल्यावर अरमोनिया फॅमिली स्पा सेंटर आहे. तेथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवुन ग्राहकाने खात्री केल्यानंतर बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता पोलिसांनी छापा टाकला. स्पा मॅनेजर व मालक सुरज शाहू याला ताब्यात घेऊन तेथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत २ मोबाईल व अडीच हजार रुपये असा २२ हजार ५०० रुपयांचा माल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.