महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सव १५ डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.
दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता पूजा व अभिषेक होणार आहे. दुपारी २:०० वाजता सर्व मंदिरांवर ध्वजारोहण करण्यात येईल, तर दुपारी २:३० वाजता श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय, कुंथलगिरी येथे स्नेहसंमेलन होणार आहे. तसेच, दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता पूजा होईल, तर दुपारी २:०० वाजता रथयात्रा महोत्सव साजरा केला जाईल. याच दिवशी दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत भोजनाची व्यवस्था असेल. दि. १६ डिसेंबर रोजीही दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय, कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन होणार आहे.
याशिवाय, दि. १५ डिसेंबर रोजी श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान, सोलापूर व श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय, कुंथलगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक व नागरिकांनी या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
















