आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जिल्हा न्यायालयाला बनावट टोनर्सचा पुरवठा

Spread the love

पुणे ; जिल्हा न्यायालयातील लेझर प्रिंटरसाठी ३० नवीन टोनर्सची मागणी नोंदवली असताना, व्यंकटेश्वर इन्फोटेक या कंपनीने कॅनॉन कंपनीचे बनावट टोनर्सचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत जिल्हा न्यायालयाचे उत्तम आनंदराव थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी व्यंकटेश्वर इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जुलै ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान शिवाजीनगर न्यायालयात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयातील लेझर प्रिंटरसाठी ३० नवीन टोनर्स व्यंकटेश्वर इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीकडून खरेदी करण्यात आले. टोनर्सची डिलेव्हरी न्यायालयाच्या नाझर कार्यालयात दिली होती. मात्र, कॅनॉन कंपनीचे ३० टोनर्स खराब असल्याने, ते संबंधित कंपनीकडे परत करण्यात आले.

दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या टोनर्सची तपासणी कॅनॉन कंपनीचे प्रतिनिधी रहीम यांनी केली. तपासणीच्या दरम्यान, टोनर्स बनावट असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर, कंपनीने कॅनॉन कंपनीचे टोनर्स बनावट असल्याची माहिती असूनही जिल्हा न्यायालयाला डिलेव्हरी करून फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.