आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • December 14, 2024
Spread the love

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमृत खेडकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली.

हवालदार खेडकर यांनी चालू वर्षात कोर्ट ड्युटी बजावताना 11 आरोपींना शिक्षा सुनावण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. यामध्ये दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागल्याने त्यांच्या कर्तव्य निष्ठेची विशेष दखल घेण्यात आली.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी अमृत खेडकर यांचा विशेष सत्कार केला आहे. सोलापूर येथे हा सन्मान समारंभ संपन्न झाला.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व झालेल्या सन्मानाबद्दल महाराष्ट्र न्युज नेटवर्क, वृक्ष संवर्धन बार्शी, बार्शी रनर्स क्लब, बार्शी सायकलिंग क्लब व हेल्थ क्लब बार्शी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.