महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आली आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान सिंगल डिजिट राहिले असून या हंगामातील निच्चांकी तापमान ७.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.
डिसेंबर महिन्यात पुण्यात आतापर्यंतचे निच्चांकी सर्वात कमी किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस २७ डिसेंबर १९६८ रोजी नोंदविले गेले होते. अहिल्यानगर येथे ५.५ अंश सेल्सिअस तर जेऊर येथे ५. अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे.
राज्यात सर्वत्र किमान तापमान घसरले असून ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते १७-१८ डिसेंबर रोजी तीव्र होऊन तामिळनाडुकडे सरकण्याची शक्यता आहे.
त्याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता असून थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
