आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्टल, काडतुस हस्तगत

Spread the love

पुणे : अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांकडून नांदेड सिटी पोलिसांनी दोन गावठी पिस्टल व एक काडतुस जप्त केले आहे. साजन विनोद शहा (वय १९, रा. धायरीगाव) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. धायरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार धायरी येथील आंबाईदरा येथे रविवारी सायंकाळी साडेसात च्या सुमारसा घडला.

याबाबत पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला हे सध्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर आहेत.

ते आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, आंबाईदरा येथे दोघे जण  कोणाची तरी वाट पहात असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. साजन शहा व कुणाल पुरी हे दोघे ही अल्पवयीन असताना त्यांच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हे दाखल आहेत. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव करत आहेत.