आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळा उत्साहात संपन्न

Spread the love

भूम : येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

मेळाव्याचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के, न्यायाधीश खान, आणि सोपान वरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाग्यश्री डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन मेघा सुपेकर यांनी केले.

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने विविध चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ तयार करून विक्री केली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासाच्या ताणतणावातून विरंगुळा मिळावा आणि पालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या मेळाव्याला पालक व नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पन्नास हजार रुपयांहून अधिक उलाढाल होऊन कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. आनंद मेळा यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, विश्वजित सुपेकर, गणेश सुपेकर, अक्षय बाराते, निलेश होरे, अमित सुपेकर, आहेर यांच्यासह अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे आभार अमर सुपेकर यांनी मानले. हा बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आनंददायी ठरला.