आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१ जानेवारीपासून लागू होणार यूपीआयशी संबंधित नवा नियम

Spread the love

पुणे : १ जानेवारीपासून यूपीआयच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. त्यामधील सर्वात मोठा बदल यूपीआयच्या व्यवहाराच्या मर्यादेमध्ये होणार आहे. आज आम्ही तुम्हाला यूपीआयच्या नवीन नियमांबद्दल माहिती देणार आहोत.

तसेच, आरबीआयने यूपीआय 123Payच्या व्यवहार मर्यादेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यूपीआय 123Pay चा वापर करून युजर्स आता ५,००० रुपयांऐवजी १०,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील.

काय आहे UPI 123Pay? UPI 123Pay ही सेवा अशा युजर्ससाठी आहे ज्यांना इंटरनेट कनेक्शनशिवाय व्यवहार करण्याची सुविधा दिली जाते. या सेवेमुळे इंटरनेट नसेल तरी पैसे भरणे शक्य होते. या व्यवहारांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न करण्यात आले आहेत.

यूपीआय 123 Pay युजर्सना पेमेंट करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध करून देते. यामध्ये आयव्हीआर नंबर, मिस्ड कॉल, ओईएम-एम्बेडेड अॅप्स, आणि साउंड बेस्ड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.