आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिक्षाचालकाला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुबाडले

Spread the love

पुणे : रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून रिक्षा निर्जन ठिकाणी नेल्यावर चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने गुगल पेद्वारे पैसे जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी विष्णु मुन्ना चव्हाण (वय २०, रा. चाकण) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील तुकारामशेठ शिंदे वाहनतळावर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक तुकाराम शिंदे वाहनतळावर ग्राहकांची वाट पाहत उभे होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती आले आणि रिक्षा निर्जन ठिकाणी नेण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करुन मारहाण केली.

त्यानंतर त्यांच्या खिशातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच गुगल पेवरून ४९०० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम करत आहेत.