नववर्षाच्या मध्यरात्री शनिवार पेठ पोलीस चौकीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे ; नववर्षाच्या रात्री तरुणीच्या मोपेडला अपघात केल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस चौकीत आणले. तेथे ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी देण्यास नकार देऊन तरुणाने पोलिसांनाच शिवीगाळ करुन गोंधळ घातला. विश्रामबाग पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अथर्व जोशी (वय २२, रा. नारायण पेठ) असे या गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रसार ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील ओंकारेश्वर रोडवरील युनिक सिटा डेल सोसासयटीसमोर व शनिवार पेठ पोलीस चौकीत १ जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्थव जोशी हा दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात होता. त्याने ओंकारेश्वर रोडवर एक तरुणीच्या मोपेडला धडक दिली. तिच्या गाडीचे नुकसान केले. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अर्थव जोशी याला शनिवार पेठ पोलीस चौकीत आणले. तेथे ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी करण्यास सांगण्यात आले.
त्याला त्याने नकार दिला. फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करीत आहेत.
