आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उपळकर यांना ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Spread the love

बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील क्रीडा शिक्षक योगेश सुभाष उपळकर यांना प्रहार शिक्षक संघटना, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मंगेश चिवटे आणि सचिन नागटिळक यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण प्रसंगी उपळकर यांच्या कुटुंबीयांसह विद्यालयाचे पर्यवेक्षक सुरेश महामुनी, खंडेराव मदने, सुहास वाघमारे, पुष्कराज पाटील, मनोज मिरगणे, हनुमंत चव्हाण, महेश माने, महेंद्र पाटील, सुरेश डिसले, विजय अनभुले, अतुल नलगे, सिद्धेश्वर शिंदे, जयप्रकाश कोरे, पंकज ठाकरे, अनिल लटके, प्रशांत बारंगुळे आणि योगेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल योगेश उपळकर यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव व शाळा समिती अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे यांसह संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले.विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एन. बी. साठे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.

क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रशिक्षणासह शाळेच्या शैक्षणिक यशामध्ये उपळकर सरांचे योगदान महत्त्वाचे आहे. गुणवंत शिक्षक पुरस्काराने त्यांना मिळालेला सन्मान हा प्रेरणादायी आहे.