आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ब्रेकिंग! HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री

Spread the love

पुणे : ह्युमन मेटाप्यूमोव्हायरस (HMPV) चीनमध्ये वेगाने पसरत असताना भारतातही त्याचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूने प्रवेश केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये दोन रुग्ण सापडले असून, देशभरात एकूण सात रुग्ण आढळले आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, आणि कोलकाता येथील रुग्णसंख्याही वाढत आहे.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये तीन महिन्यांच्या मुलीला आणि आठ महिन्यांच्या बालकाला एचएमपीव्ही संसर्गाचे निदान झाले आहे. ब्रोंकोन्यूमोनियामुळे या बालकांना उपचारांसाठी बॅपटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणीत विषाणू संसर्ग आढळल्यानंतर मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ महिन्यांच्या बालकाची प्रकृती सुधारत असल्याचे कर्नाटक आरोग्य विभागाने सांगितले.

गुजरातमधील अहमदाबाद येथे दोन महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. सर्दी आणि तापामुळे १५ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर अवस्थेमुळे काही काळ त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. तामिळनाडूमध्येही दोन मुलांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.एचएमपीव्ही संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आणि प्रतिबंधक उपायांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमाल किंवा टिश्यूने झाकून ठेवा.

साबण व पाण्याने किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने वारंवार हात धुवा.

ताप, खोकला, किंवा शिंका असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.

हवा खेळती राहील याची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या.

हस्तांदोलन आणि टिश्यू किंवा रुमालाचा पुनर्वापर.

आजारी लोकांच्या जवळ जाणे.

डोळे, नाक, व तोंडाला हात लावणे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे.