महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चंदननगर पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आणि चोरीस गेलेले मुद्देमाल जप्त केले आहेत. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यात त्यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराची कोडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि ५,४७,००० रुपयांचे सोने चोरून नेले. यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान, त्यांना आरोपी विधी संघर्षित बालक असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या पालकांसमवेत आरोपींचा शोध घेतला आणि चोरीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला.
आरोपींच्या चौकशीत त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि इतर माल दर्शन दत्तात्रय कोळी आणि अनिल करेप्पा कोळी यांना विकल्याचे सांगितले. तपासात पुढे येवून, आरोपींनी सांगितले की त्यांनी चोरीचे सोन्याचे दागिने सोनार सत्यवानकाका यमगर याला विकले होते.
पोलिसांनी यमगरचा शोध घेतला आणि त्याच्याकडून ३,५०,००० रुपयांची सोन्याची लगड जप्त केली. या कारवाईत सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांचे पथक सक्रिय होते. याशिवाय, चंदननगर पोलिसांनी अन्य एका गुन्ह्याचा तपासही यशस्वीपणे उकलला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
