महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : दैनंदिन कर्तव्ये पार पाडताना पोलिसांना मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागतो. या मानसिक ताणाचा प्रभाव कमी करण्यासाठी मन एकाग्र करून स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि ताणतणाव कमी करण्याची पद्धत शिकवण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय अंबादास थोरात (कोरे) यांच्या संकल्पनेतून स्वसंमोहन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले. हे प्रशिक्षण सोलापूर येथील संमोहनतज्ञ रविंद्र सोरटे यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या आरतीने झाली. यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय थोरात (कोरे) यांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच नव्याने बार्शी तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या संगीता पवार यांचा सन्मान बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा पीआरओ प्रा. अनिल मुंढे यांचाही सत्कार बालाजी मुंढे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांनी केले.
बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे आयोजित या शिबिरामध्ये सोरटे यांनी प्रात्यक्षिकासह तणाव कमी करण्याचे तंत्र शिकवले. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीने जनसंवादाच्या माध्यमातून आयोजित केलेले हे प्रशिक्षण तणावमुक्तीसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरेल, असे मत सहभागी शिबीरार्थींनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय थोरात (कोरे), जिल्हा जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे, बार्शी तालुका उपाध्यक्षा संगीता पवार, व इतर मान्यवर उपस्थित होते.
