आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अधिकार्‍याने कंपनीला घातला ३५ लाखांचा गंडा

Spread the love

पुणे : कल्याणीनगर येथील जॉय अँड क्रू व्हेकेशन्स एलएलपी या कंपनीमध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्याने कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल ३४ लाख ७१ हजार रुपये काढून कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत कंपनीच्या वतीने आशिष मुळे (वय ४७, रा. हिंगणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी राकेश कुमार निरंजन पाणिग्रही (वय ३०, रा. सोरा, अनंतरपूर, बालेश्वर, ओडिशा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार २६ डिसेंबर २०२३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमार पाणिग्रही हा जॉय अँड क्रू व्हेकेशन्स एलएलपी कंपनीत नोकरीला होता.
नोकरीच्या काळात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने कंपनीच्या खात्यातून २९ लाख १६ हजार ६७८ रुपये आणि कॅमेलिया ड्रीम हॉलिडेज या प्रोपायटरशिप कंपनीतून ५ लाख ५५ हजार ७९ रुपये असे एकूण ३४ लाख ७१ हजार ७५७ रुपये अपहार करून कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील करत आहेत.